Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये वार्ड क्रमांक 2 मधील अपक्ष उमेदवार दत्तात्रय सिताराम पिंपळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रवीण विठ्ठलराव ढोरे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
वडगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सध्या होत असून या निवडणुकीत वार्ड क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवीण ढोरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच या वार्ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच दत्तात्रय सिताराम पिंपळे हेही अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी वडगाव मावळ येथे पत्रकार परिषद घेत पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत आवाहन केले होते.
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दत्तात्रय सिताराम पिंपळे यांनी वार्ड क्रमांक दोन मध्ये आपल्या अपक्ष उमेदवारीबद्दल थांबण्याची भूमिका स्पष्ट केली. तसेच, प्रवीण विठ्ठलराव ढोरे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी प्रवीण विठ्ठलराव ढोरे व अन्य सहकारी उपस्थित होते.
“वडगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये मी प्रभाग क्रमांक दोन मधून माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडलेल्या विकासाभिमूख भूमिका आणि स्थानिक प्रश्नांबाबत दाखवलेली बांधिलकी याचा सखोल विचार करून मी निवडणूक लढवणार नसून या निवडणुकीत माझा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक दोन चे घड्याळ चिन्हावरील अधिकृत उमेदवार प्रवीण विठ्ठलराव ढोरे यांना देत असून हे पत्र काढून बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे आणि आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणार,” असे दत्तात्रय सिताराम पिंपळे यांनी सांगितले आहे.
आमदार सुनील शेळके यांच्याकडून वडगाव व कातवी मधील नागरिकांना विकासकामांबाबत मिळालेला आश्वासक शब्द, यामुळे आपण थांबण्याची भूमिका घेतली असून पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे श्री. पिंपळे यांनी सांगितले. तसेच पाठींबा देत असताना आणि माघार घेत असताना कुठल्याही अटी शर्ती शिवाय आपण हा पाठिंबा देत असून आमदार सुनील शेळके व गणेश खांडगे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे पिंपळे यांनी दैनिक मावळशी बोलताना सांगितले.

प्रवीण ढोरे यांचा मार्ग झाला सोपा?
वडगाव नगरपंचायत वार्ड क्रमांक दोन मध्ये आता दत्तात्रय पिंपळे यांनी माघार घेतल्यामुळे प्रवीण ढोरे यांच्यासमोर फक्त भाजपच्याच उमेदवाराच्या आव्हान राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी दुरंगी लढत होईल, असेच चित्र आहे. आमदार सुनील शेळके यांनी केलेली विकासकामे आणि त्यांनी मांडलेली विकासाची धोरणे या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठिंबावर या निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास प्रवीण डोरे यांनी दैनिक मावळसोबत बोलताना व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
