व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : वॉर्ड क्रमांक 6 मध्ये मयूर ढोरे यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटी । Vadgaon Maval

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 25, 2025
in लोकल, मावळकट्टा, शहर
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Mayur Dhore meets voters in Ward No 6

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. रविवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला होता. तदनंतर सोमवारी सर्वच वार्डमधील उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली होती.

वडगाव नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक सहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी मयूर ढोरे यांनी आपल्या वार्डमध्ये प्रचार दौरा आयोजित केला होता. यामध्ये वार्डमधील प्रत्येक घरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत मयूर ढोरे यांनी मतदारांशी संवाद साधला, यावेळी मतदारांनी देखील मयूर ढोरे यांचे उत्साहात स्वागत केले.

यावेळी मागील पाच वर्षात नगराध्यक्ष म्हणून केलेली कामे आणि आगामी पाच वर्षांत नगरसेवक म्हणून निवडून आल्यास करायची कामे, याचा लेखाजोखा श्री ढोरे यांनी मतदारांपुढे मांडला. मतदारांनी देखील विकासकामांच्या जोरावर मयूर ढोरे यांनाच पसंती देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. एकूणच प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसाद श्री. ढोरे यांच्याबाबत पाहायला मिळाला.

“मागील पाच वर्षात आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शंभर कोटींची जवळपास विकासकामे वडगाव शहरात झाली. येत्या काळामध्येही अशाच प्रकारे वडगावात विकास कामे होतील. परंतु आता नगरसेवक म्हणून वार्ड क्रमांक सहा मध्ये विशेष लक्ष देणार असून या वार्ड साठीचे माझे व्हिजन तयार आहे”, असे मयूर ढोरे यांनी ‘दैनिक मावळ’शी बोलताना सांगितले.

वडगाव नगरीतील एक आदर्श प्रभाग अर्थात आयडियल प्रभाग, स्मार्ट प्रभाग बनविण्यासाठी वॉर्ड सहा मध्ये आपण वेगवेगळ्या उपक्रमांची राबवणी करणार आहोत, तसेच वेगवेगळी विकासकामे पूर्ण करून राहिलेल्या प्रश्नांची पूर्तता सोडवणूक करण्याचे काम पुढील काळात करणार असल्याचा विश्वास मयूर ढोरे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अनेक मान्यवर, युवा सहकारी आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव नगरपंचायत निवडणूक : अपक्ष उमेदवार दत्तात्रय पिंपळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रविण ढोरे यांना बिनशर्त पाठींबा

Next Post

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : वॉर्ड क्रमांक 11 मध्ये सुनील ढोरे यांच्याकडून जोरदार प्रचार । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Strong campaign by Sunil Dhore in Ward No 11

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : वॉर्ड क्रमांक 11 मध्ये सुनील ढोरे यांच्याकडून जोरदार प्रचार । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.