Dainik Maval News : मुंढावरे येथे सोमवारी ( दि. 24 ) जिल्हा परिषद व पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग) यांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा सांस्कृतिक महोत्सव २०२५/२६ अंतर्गत केंद्र स्तरीय स्पर्धा पार पडल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडळ व शालेय व्यवस्थापन समिती मुंढावरे यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या स्पर्धा आणि माजी विद्यार्थी स्नेहा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये मुंढावरे, वळक, सांगिसे, बुधवडी, वेल्हवळी, खांडशी, नेसावे, उंबरवाडी, वाडीवळे इ. शाळा सहभागी झाल्या होत्या. सांस्कृतिक नृत्य, वैयक्तिक गायन, भजन, कबड्डी, खो-खो, कविता गायन, प्रश्नमंजुषा, बेडूकउडी, लांबउडी, उंचउडी, धावणे, लिंबू चमच्या, स्पर्धा इत्यादी स्पर्धा पार पडल्या. या सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंढावरे गावचे सरपंच राणीताई सनी जाधव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई काशीकर, निलेश अवसरमोल ( मंडलाधिकारी टाकवे खुर्द) राम बाचेवाड (ग्राममहसुल अधिकारी) केंद्रप्रमुख शशिकांत वायाळ, सुहास धस, उपसरपंच स्वप्नाजा थोरात, पोलीस पाटील नम्रता थोरात, सनी जाधव, गणेश चव्हाण, सचिन गरुड, योगेश चव्हाण, संदीप जाधव, कविता बांगर, सागर रणपिसे, अमोल थोरवे, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सर्व विजेत्या विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सर्व शाळेच्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दिपक गायकवाड, उपाध्यक्ष दत्ता कदम, रोहिदास वाघमारे, अमोल थोरात, शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता मोरे, शिक्षिका हेमलता गायकवाड यांनी केले होते. आभार दिपक गायकवाड यांनी मानले. प्रशासनामार्फत व सांगिसे केंद्रामार्फत नियोजक व आयोजक मुंढावरे यांचे कौतुक करण्यात आले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…
