Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 मध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. तळेगाव नगरपरिषदेच्या नगरसेवकपदाच्या ६ प्रभागांमधील निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम व निवडणूक आदेश जाहीर करण्यात आला आहे.
आदेशानुसार आवश्यक असल्यास या प्रभागांतील जागांसाठी येत्या २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. इतर प्रभागांतील सदस्य निवडणूक तसेच सर्व प्रभागांतील नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सुरू राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार ज्या प्रभागामध्ये न्यायालयीन अपील दाखल झालेले होते व त्यांचे निकाल दिनांक 23/11/2025 व तद्नंतर प्राप्त झाले आहेत. त्यानुसार प्रभाग क्र, 2 अ, 7 अ, 7 ब, 8 अ, 8 ब आणि 10 ब प्रभागातील फक्त सदस्य यांचे निवडणूक स्थगित करण्यात येत आहे. त्यासाठीचा सुधारित निवडणूक कार्यक्रम निवडणूक आदेश सोबत दिलेला आहे. इतर प्रभागातील सदस्य व सर्व प्रभागात नगराध्यक्ष निवडणूक प्रकिया नियोजित वेळेनुसार सुरू राहणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…

