Dainik Maval News : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे माळवाडी येथील मा. उपसरपंच सुनील नाना भोंगाडे यांच्या माध्यमातून ठाकर समाजातील 270 बंधू – भगिनींनी नुकतीच कोल्हापूर यात्रा पूर्ण केली. या दरम्यान सर्वांनी आई महालक्ष्मी देवीचे आणि श्री संत बाळूमामा यांचे दर्शन घेतले. खास ठाकर समाजातील बंधू-भगिनींसाठी आयोजित केलेल्या या कोल्हापूर यात्रेबद्दल श्री. भोंगाडे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे मावळ तालुक्याचे प्रभारी असणारे सुनील नाना भोंगाडे हे इंदोरी पंचायत समिती गणातील सर्वात प्रभावी अन् सक्षम उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. गेली पंचवीस वर्षांच्या सामाजिक, राजकीय कारकिर्दीत सुनील भोंगाडे यांनी आजवर अनेक आदर्शवत उपक्रम राबविले आहेत. आताही त्यांनी खास ठाकर समाजातील बंधू-भगिनींसाठी ह्या कोल्हापूर यात्रेचे आयोजन केले होते.
सुनील नाना भोंगाडे यांच्या माध्यमातून आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 27) सुदुंबरे येथील ठाकर वस्तीमधील सुमारे 270 बंधू भगिनींची ही कोल्हापूर श्री महालक्ष्मी आणि संत बाळूमामा दर्शन यात्रा संपन्न झाली. संपूर्ण प्रवास अतिशय सुखकर आणि आनंददायी झाला, अशा भावना बंधू-भगिनींनी व्यक्त केल्या. शिवशक्ती सेवा मंडळ आणि सुनील नाना भोंगाडे मित्र परिवार यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
या दर्शन यात्रेदरम्यान सर्जेराव भोंगाडे, गणेश गाडे, संकेत जाधव, केतन जाधव, सागर जाधव, रोहिदास चांदगुडे, विजय भोंगाडे, भरत राजवडे, दत्ताभाऊ शिंदे, भूषण पिंपळे आदी सहकाऱ्यांनी यात्रा सफल करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
भविष्यकाळात देखील मायबाप जनतेसाठी असे उपक्रम राबविण्याचा मानस सुनील नाना भोंगाडे यांनी बोलून दाखविला. तर, ठाकर समाजातील बंधू भगिनींनी देखील आगामी काळात सुनील नाना भोंगाडे यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल

