Dainik Maval News : मंगळवारी, २ डिसेंबर रोजी होणाऱ्या लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत दोन प्रभागांतील मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. नांगरगाव (प्रभाग ५ ब) आणि गवळीवाडा (प्रभाग १० अ) या दोन प्रभागांमधील उमेदवारांच्या अर्जांवर हरकती दाखल झाल्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
नांगरगाव प्रभागातील भाजप उमेदवार सुभाष डेनकर यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मुकेश परमार यांनी न्यायालयात हरकत दाखल केली होती. निवडणूक आयोगाने तसेच न्यायालयानेही ही हरकत फेटाळत डेनकर यांचा अर्ज वैध ठरवला होता.
याचप्रमाणे, गवळीवाडा प्रभागातील भाजप उमेदवार अश्विनी जाधव यांच्या अर्जावर काँग्रेसच्या वैशाली मोगरे यांनी आक्षेप घेतला होता. येथेही निवडणूक आयोग तसेच न्यायालयाने जाधव यांचा अर्ज ग्राह्य धरत हरकत नामंजूर केली होती.
दरम्यान, निवडणुकीची इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, २९ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने दिलेला आदेश ३० नोव्हेंबरला लोणावळा नगरपरिषदेत या आदेशानुसार, राज्यभरातील ज्या नगरपरिषदांमध्ये उमेदवारी अर्जांवरील हरकतींचे निकाल २२ नोव्हेंबरपर्यंत लागलेले नाहीत, त्या सर्व जागांवरील निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उर्वरित सर्व प्रभागांमध्ये मतदानाची प्रक्रिया २ डिसेंबर रोजी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल


