Dainik Maval News : चांदखेड ( ता. मावळ ) गावच्या हद्दीतील अवैध दारू अड्ड्यावर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत मुद्देमाल जप्त करून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
चांदखेड गावच्या हद्दीत चांदखेड ते कासारसाई रोडलगत कंजारभट वस्तीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत ( दि. 30 ) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई दिलीप विश्वनाथ राठोड यांनी फिर्याद दिली असून जोरावरसिंग संभाजी राठोड (वय ३१ वर्षे, रा. कंजारभटट वस्ती, चांदखेड) याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ ( क ) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गावठी हातभटटी दारू तयार करण्यासाठी लागणारे १,५०० लीटर गुळ मिश्रीत कच्चे रसायन दारू असा एकूण ५२,५००/- रु एकूण चा प्रोव्हिशनचा माल बेकादेशीर रित्या भिजत घालताना मिळुन आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेला. सपोफौ वनवे हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल


