Dainik Maval News : राज्याच्या महसूल विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. डिजिटल कारभारास प्रोत्साहन देणारा आणि सामान्यांना दिलासा देणारा निर्णय महसूल विभागाने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यानुसार यापुढे डिजिटल 7/12 उतारा हा अधिकृत असणार आहे. यामुळे अपोआपच तलाठ्यांचे काम कमी होणार असून नागरिकांचेही सरकारी दरबारी खेटे कमी होणार आहे.
महसूल विभागात डिजिटल क्रांती!
डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने घेतला असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. याबाबत त्यांनी एक्स या सोशल मीडिया हॅन्डलवर अधिकृत पोस्ट केली आहे.
या निर्णयामुळे :
1. डिजिटल ७/१२ ला अधिकृत मान्यता
2. फक्त ₹१५ मध्ये अधिकृत उतारा उपलब्ध
3. तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज संपली
4. डिजिटल स्वाक्षरी, QR कोड, आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले ७/१२, ८-अ व फेरफार उतारे
5. सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध
हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा, पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा नवा अध्याय लिहितोय. राज्यातील जनता या निर्णयाचे स्वागत करेल, याची मला खात्री असून डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल पडल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

🔸महसूल विभागात डिजिटल क्रांती!
डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
या निर्णयामुळे:
• डिजिटल ७/१२ ला अधिकृत मान्यता
• फक्त ₹१५ मध्ये अधिकृत… pic.twitter.com/Sv1jHnHzWj— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 4, 2025
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल
