Dainik Maval News : लोणावळा शहराजवळील लायन्स पॉईंट येथे शनिवारी ( दि. 6 ) कार आणि टेम्पोच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
लायन्स पॉईंट येथे शनिवारी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पो चालक जखमी झाला आहे.
दर्शन शंकर सुतार (वय 21) आणि मयूर वेंगुर्लेकर (वय 24, दोघेही रा. म्हापसा, गोवा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर टेम्पोचालक भीमा विटेकर (वय 60, रा. वाकसई, मावळ) हे जखमी झाले आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जलसा रिसॉर्ट येथून लायन्स पॉईंटकडे भरधाव वेगात निघालेली कार (जीए 03 एएम 0885) समोरून येणाऱ्या टेम्पोला (एमएच 14 जेएल 5525) धडकल्याने कारमधील दोन्ही तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
गोवा येथून आलेले तरूण…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हापसा (रा. गोवा) येथून लोणावळ्यात चौदा तरुण तीन कारमधून फिरायला आले होते. गुरुवारी सर्वजण लोणावळ्यात आले व घुसळखांब येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. शनिवारी सकाळी योगेश सुतार आणि मयूर वेंगुर्लेकर हे दोघेजण स्विफ्ट कारमधून लायन्स पॉईंट येथे पर्यटनासाठी हॉटेलमधून बाहेर पडले आणि साधारण दीड किमी अंतरावर हा अपघात झाला.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
