Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त योगेश म्हसे यांच्यासोबत मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली.
मावळच्या प्राधान्य असलेल्या प्रकल्पांना तात्काळ चालना देण्यासाठी मंजूर आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व कामांना लगेच सुरुवात करण्याबाबत या बैठकीत ठोस चर्चा झाली.
देहू–येलवाडी रस्ता तातडीने सुरू करणे, परंडवाल चौक–देहू ते तळवडे रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे, पावसामुळे रखडलेली रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे नेणे, पुणे–मुंबई महामार्गावरील चौकांचे रुंदीकरण व सुशोभीकरण, गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे सुधारणा काम तसेच इंद्रायणी व पवना नदीतील प्रदूषण रोखण्यासाठीच्या तातडीच्या उपाययोजनांवरही सखोल चर्चा झाली.
या बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी सर्व कामे गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. PMRDA आयुक्त योगेश म्हसे यांच्यासह बांधकाम विभागाचे आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीत मावळ तालुक्यातील सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
