Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील आरोग्य क्षेत्रातील दीपस्तंभ असलेल्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड कॉन्व्हलेसंट होम या संस्थेला १०० वर्षे (शताब्दी) पूर्ण झाल्याबद्दल रविवारी ( दि. ७ ) भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरात आणि शहर परिसरात तळेगाव जनरल हॉस्पिटल मधून सेवा दिलेले आणि देत असलेल्या नामवंत ५०० डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील शेळके, डॉ. परवेज ग्रँट यांसह व्यासपीठावर गणेश खांडगे, डॉ. उदय देशमुख, डॉ. सुचित्रा नागरे, डॉ. श्रीकांत जोशी, नितीन सरदेसाई, डॉ. सुधीर भाटे, डॉ. सत्यजित वाढोकर, हेमंत सरदेसाई, सत्त्यशील राजे दाभाडे, वृषाली राजे दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. ग्रँट यांनी मनोगतात, ग्रामीण भागातील रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी रुबी हॉस्पिटल आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल हे तळेगाव दाभाडे शहरात संयुक्तपणे नवे उपचार केंद्र उभारेल, असे सांगितले.
तर, आमदार सुनील शेळके यांनी, रुबी हॉल आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित होणाऱ्या नवीन हॉस्पिटलला दहा कोटी रुपये देणगी रूपाने उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा केली. तर भूमिपूजनावेळी एक कोटी रुपयांचा धनादेश दिला जाईल, असे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सचिव शैलेश शहा यांनी प्रास्ताविक केले. चंद्रभान खळदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मावळ तालुक्यातून वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त, डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

