Dainik Maval News : पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी घेरले आणि पिस्तूल, काडतूसासह रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी ( दि. ७ ) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास मामुर्डीतील दाभोळे मैदान, सिध्दार्थ नगर येथे करण्यात आली.
याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई हर्षद कदम यांनी देहूरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी आशिष दत्तात्रय भालेराव ( वय २७ वर्षे, रा. थॉमस कॉलणी, साईनगर, देहुरोड) याच्यावर आर्म अॅक्ट कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अवैध शस्त्रे बाळगण्याबाबत मनाई आदेश असताना, सदर आदेशाचा भंग करुन आरोपी हा ५१,००० रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्टल आणि १ जिवंत काडतुसे ( राऊंड) बाळगताना मिळून आला आहे. आरोपी अटकेत असून पुढील तपास पोउपनि वाव्हळे हे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण


