Dainik Maval News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे आज (सोमवार, दि. ८) दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. परंतु आजरोजी (दि. ८ डिसेंबर) रात्री सव्वा आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बाबा आढाव यांच्या निधनाने समाजातील श्रमिक, कष्टकरी जनतेचा आवाज हरपला आहे.
बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुणे येथे झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असे आहे. त्यांनी असंघटित कामगारांसाठी आपले आयुष्य वेचले. रिक्षाचालक, हमाल, हातगाडी ओढणारे आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारला. तसेच साहित्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले.
हमाल पंचायतीची स्थापना
बाबा आढाव यांनी त्यांच्या आयुष्यात श्रमिकांसाठी अनेकवेळा मोलाचे योगदान दिले. यात हमाल पंचायती चा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. पुणे येथे आढाव यांनी ‘हमाल पंचायत’ आणि ‘असंघटित कामगार कर्मचारी महासंघ’ यांसारख्या संस्था स्थापन केल्या. त्यांनी दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठीही काम केले. समाजातील वंचित घटकांसाठी केलेल्या कामामुळे बाबा आढाव यांना पुण्याचे कुटुंबप्रमुख म्हटले जात. बाबा आढाव यांनी सामाजिक विषयांवर आणि आपल्या चळवळींवर आधारित अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत.
1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली, जी अत्यंत गाजली. अगदी वयाच्या 93 व्या वर्षीही त्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
आपल्या महाराष्ट्रात प्रागतिक ,कृतीशील विचार मांडून ते आचरणात आणणाऱ्या शिलेदारांची एक मोठी फळी आहे. भूमिका घेताना परिणामांची, प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉ. बाबा आढाव ह्यांचं नाव… pic.twitter.com/rTAlVN9pIL
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 8, 2025
ज्येष्ठ समाजसेवक, श्रमिक व वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने समाजकार्यातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्यासोबतच्या संवादातून मला नेहमीच सामाजिक… pic.twitter.com/pLDpp8LaBQ
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) December 8, 2025
असंघटीत कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कायम संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव (९६) यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, मोलकरीण पंचायत, कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत, बांधकाम कामगार पंचायत, टेम्फो पंचायत अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून… pic.twitter.com/BtNrHxdUo8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 8, 2025
गोर गरीब शोषितांचा बाबा गेला!
बाबा आढाव यांना आदरांजली! pic.twitter.com/xhVbMRakQz— Sanjay Raut (@rautsanjay61) December 8, 2025
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

