Dainik Maval News : मावळ तालुक्यात आणखीन एक निर्भया प्रकरण घडले आहे. हृदय पिळवटून टाकणारी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अशी ही घटना उघडकीस आली आहे. उर्से येथे पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून रविवारी ही घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे. ( Heartbreaking incident in Maval taluka 5-year-old girl brutally murdered after being raped accused arrested )
शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही पाच वर्षीय चिमुकली घरातून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याचे उघड झाले. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून निर्भयाच्या घराजवळ राहणाऱ्या समीर कुमार मंडल ( वय 32 वर्षे, रा. उर्से, मुळ रा. झारखंड, व्या. जय हिंद कंपनीत कामास) याला ताब्यात घेतले. संशयित आरोपीची चौकशी करीत असताना त्यानेच केलेल्या गैरकृत्याची आणि हत्येची कबुली देत निर्भयाचे शव दाखविले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात चिमुकली अनेकदा घरात एकटीच असायची, याच परिस्थितीचा फायदा घेत सदर विवाहित आरोपी समीर मंडळ याने तिला घराजवळच काही मीटर अंतरावर नेले. चॉकलेटचे आमिष दाखवून तिला बाजुला नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर गळा दाबून तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ( Nirbhaya case again in Maval wave of anger in the entire taluka demand for strictest punishment )
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉक्टरांच्या अहवालानुसार आणि अधिक तपासातून उघड होणाऱ्या माहितीनुसार कलमवाढ केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर मावळ तालुत्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
