व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले – वाचा सविस्तर

पुणे जिल्ह्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी ११ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 13, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, व्हिडिओ, शहर
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील गट क्रमांक 36, 37, 38 तसेच 35, 41, 42 आणि 46 या भागांत खाणपट्ट्यांच्या मर्यादेपेक्षा तब्बल ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस सर्व्हेवरुन निदर्शनास आले आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत दुसऱ्यांदा चौकशी केल्यानंतर स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार न पाडल्याचे उघड झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Novel NIBR Ads

यासंदर्भात विधानसभा सदस्य सुनील शेळके यांनी लक्षवेधी सूचना मांडली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे उत्खननाची परवानगी 3 लाख 63 हजार ब्रास इतकी असतानाही 4 लाख 54 हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले.

यासंदर्भात, विभागीय आयुक्तांमार्फत नव्याने चौकशी केली असता, तपासात उत्खननाचे प्रमाण परवानगीपेक्षा अत्यंत जास्त असल्याचे आणि स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार न पाडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अवैध उत्खनन होत असताना जबाबदारी न निभावणाऱ्या संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारावर तत्काळ निलंबन कारवाई जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर, यासंदर्भात विभागीय आयुक्त यांनी दिलेला पहिल्या अहवालाची तपासणी मुख्य सचिवांमार्फत करण्यात येईल.

Novel NIBR Ads

या निलंबन केलेल्या अधिकाऱ्यांवर तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण केली जाणार असून चौकशी अहवाल पुढील अधिवेशनात पटलावर ठेवण्यात येईल, असे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले की, यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन दंड व व्याजासह रक्कम वसूल करण्यात येईल. त्याचबरोबर, सातबारा नोंदीवर नोंद आणि दंड न भरल्यास सातबारा नोंदीवर कायमस्वरूपी नोंद राहणार राहणार आहे.

अवैध उत्खनन रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात ईटीएस सर्वे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले की, प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावात परवानगी व प्रत्यक्ष उत्खननाचा सविस्तर तुलनात्मक अहवाल तयार केला जाणार आहे. या लक्षवेधी सुचनेत सदस्य सुधीर मुनगंटीवार, बाबासाहेब देशमुख, समाधान आवताडे यांनीही उपप्रश्न विचारले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार
– लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा
– इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान
– नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन

Next Post

मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.