Dainik Maval News : मावळ तालुक्यातील उर्से गावात ५ वर्षीय मुलीवर बला’त्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून मावळ तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ उर्से गावातील नागरिकांच्या वतीने कडकडीत बंद पाळून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
उर्से गावामध्ये ५ वर्षांच्या मुलीवर ३० वर्षीय तरुणाने बलात्कार केला. आरोपीने बलात्कारानंतर चिमुकलीची हत्या केली आणि मृतदेह झुडपामध्ये फेकून दिला. सदर पीडित मुलीचे आई-वडील कंपनीत काम करतात, ते आपल्या दोन्ही मुलांना घरीच सोडून जायचे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी सकाळी कामाला केले. परंतु घरी आल्यानंतर त्यांना मुलगी दिसली नाही त्यामुळे त्यांनी शोध घेतला.
खुप वेळ शोधूनही मुलगी न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून शेजारी राहणाऱ्या समीर कुमार मंडल याला ताब्यात घेतले होते. त्याने चौकशीत कबुली दिली. त्यानंतर चिमुकलीचा मृतदेह रविवारी एका शेतात झुडपात आढळून आला. पोलीस तपासात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले.
या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यात संतापाची लाट पसरली. या घटनेच्या निषेधार्थ उर्से गावातील नागरिकांकडून दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात आली. ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. तर तालुक्यातील अन्य भागातही या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
