Dainik Maval News : विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्थान पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित सप्तशती संगम संमेलन 2025 ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल, गहुंजे येथे शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले. खऱ्या अर्थाने येथे आपल्याला सप्तशक्ती संगम पहावयास मिळाला. गहुंजे परिसरातील शेकडो महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला यासाठी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमामध्ये कांता बोडके व ताराबाई राक्षे या दोन मातांना आदर्श माता या सन्मानाने गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून निवेदिता कच्छाव या उपस्थित होत्या. त्यांनी ‘कुटुंब प्रबोधन आणि भारतीय पर्यावरण दृष्टिकोन तसेच भारताचा विकासात महिलांचे योगदान ‘या विषयावरती मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून संपदा पापळकर उपस्थित होत्या. तसेच ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग डायरेक्टर पोर्णिमा बोडके, वर्षा बोडके, उर्मिला शेलार, ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका विजिला राजकुमार याही उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना पौर्णिमा बोडके यांनी ‘विवाह एक संस्कार की करार’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ‘नारीशक्ती’ या विषयावर वर्षा बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी दिपाली शिंदे (सप्त शक्ती संमेलन प्रांत सह संयोजिका ) संजना मगर (सप्तशक्ती संमेलन पिंपरी चिंचवड संयोजिका ) अश्विनी गोरखे ( विद्याभारती पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष) उपस्थित होत्या.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
