मावळ तालुक्यात जाहीर झालेल्या 9 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांपैकी शिरगाव वगळता उर्वरित 8 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी रविवारी शांततेत मतदान झाले. शिरगाव ग्रामपंचायत येथील सरपंचपदाचा उमेदवार आणि सर्व 9 सदस्य बिनविरोध झाले असून सरपंचपद वगळता इंदोरी ग्रामपंचायतचे सर्व 17 सदस्य बिनविरोध झाले आहेत. ( Gram Panchayat Election 2022 79.80 percent polling in Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे इंदोरी, निगडे, सावळा, भोयरे, कुणे ना.मा., देवले, वरसोली आणि गोडूंब्रे या गावांत काही ठिकाणी फक्त सरपंच पदासाठी तर काही ठिकाणी सरपंच + ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आज (रविवार, 18 डिसेंबर) मतदान पार पडले.
मावळ तालुक्यात सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या होती 9 यात सदस्य अधिक सरपंच. यात प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या होती 8. याकरिता एकूण मतदान केंद्र होते 27 आणि मतदारांची संख्या होती स्त्रिया 7093 + पुरुष 7484 इतर 0 असे एकूण 14,577 मतदार होते. पैकी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत स्त्रिा 5601 आणि पुरुष 6031 असे एकूण 11,632 मतदारांनी म्हणजेच 79.80 टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.
अधिक वाचा –
– धक्कादायक! सरपंच पदाच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन फेविस्टिकने केले बंद
– मुंढावरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारती थोरवे बिनविरोध