Dainik Maval News : नुकत्याच झालेल्या नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकांमध्ये मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. आजवर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मावळात कधीही न मिळाले इतके यश राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा मिळाले. याबद्दल अजित पवार यांनी मावळच्या मतदारांचे आभार मानले आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाचे भरते आले. तळेगावमध्ये 17, वडगावात 9 आणि लोणावळ्यात 16 नगरसेवक घड्याळ चिन्हावर निवडून आले. तर, वडगाव आणि लोणावळ्यात घड्याळ चिन्हावरील नगराध्यक्ष निवडून आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला मिळालेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मावळच्या या विजयाचे शिल्पकार असलेले आमदार सुनील शेळके यांचे अभिनंदन करून कौैतुक केले आहे, तसेच मावळच्या मतदार जनतेचे आभार मानले आहे. स्वतः आमदार सुनील शेळके यांनी पोस्ट करून ही माहिती दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश

