व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक

नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत तळेगाव दाभाडे शहरात भाजपा-राष्ट्रवादी युतीचे परंतु भाजपाच्या कमळ चिन्हावर संतोष दाभाडे हे नगराध्यक्ष झाले असून लोणावळा आणि वडगाव येथे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नगराध्यक्ष झाले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 23, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
NCP in Vadgaon Lonavla BJP in Talegaon Dabhade NCP has highest number of corporators in maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि लोणावळा नगरपरिषद या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे निकाल समोर आले असून या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार ) या पक्षाची सरशी झाली असून सर्वाधिक नगरसेवक आमदार सुनील शेळके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे आले आहेत. तर, नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत तळेगाव दाभाडे शहरात भाजपा-राष्ट्रवादी युतीचे परंतु भाजपाच्या कमळ चिन्हावर संतोष दाभाडे हे नगराध्यक्ष झाले असून लोणावळा आणि वडगाव येथे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नगराध्यक्ष झाले आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद :
तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला 17, भाजपला 10 व अपक्ष 1 जागेवर विजय मिळवता आला. तर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हे 11755 मतांनी विजयी झाले. एकूण 28 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यापैकी 19 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आल्याने 9 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी 4 नगरसेवक पद व नगराध्यक्षपदासाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली व उर्वरित 4 प्रभागातील 5 जागांसाठी 20 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली होती.

रविवार (दि. 21) सर्व 9 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये महायुतीत ठरल्याप्रमाणे 17-11 हा फॉर्म्युला फेल झाला. भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेल्या 11 जागांपैकी 10 जागांवर भाजपला विजय साधता आला. तर प्रभाग क्रमांक 2 अ मधून तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार डॉ. ऋतुजा कल्पेश भगत यांनी भाजपच्या विभावरी रवींद्रनाथ दाभाडे यांचा पराभव करून विजय मिळविला. अशाप्रकारे राष्ट्रवादी पक्षाला 17, भाजप 10 व अपक्ष 1 जागेवर विजय मिळवता आला.

लोणावळा नगरपरिषद :
मागील अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या लोणावळा नगरपरिषदेवर राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आपला एकहाती झेंडा नगर परिषदेवर फडकवला आहे. लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे यांनी 10 हजार 681 मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला आहे. तर नगरसवेक पदाच्या बाबत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 16, भाजप 4, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 जागा, काँग्रेस 3, अपक्ष 3 असे पक्षीय बलाबल लोणावळा नगरपालिकेत निर्माण झाले आहे.

वडगाव नगरपंचायत :
वडगाव नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह 9 जागांवर विजय मिळवत मावळ तालुक्याची राजधानी असलेल्या वडगाव शहरात झेंडा फडकवला आहे. दरम्यान, भाजपला 6 जागांवर विजय मिळाला तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीत 4 प्रभागांच्या निकालामध्ये माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांचा पराभव झाल्याने आणि एक उमेदवार अवघ्या एका मताने विजयी झाल्याने पहिली फेरी राष्ट्रवादीच्यादृष्टीने धक्कादायक ठरली. परंतु दुसऱ्या फेरीपासून राष्ट्रवादीचा दबदबा दिसून आला. भाजपच्यादृष्टीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल म्हाळसकर यांचा 1460 मतांनी झालेला पराभव धक्कादायक ठरला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक निकाल : नगराध्यक्षपदी युतीचे संतोष दाभाडे विजयी, 28 पैकी 17 जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक

Next Post

मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mangrul illegal mining case Statewide agitation if suspension of revenue officers is not withdrawn

मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.