व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

…अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा

बुधवारी ( दि. १७ ) पंचायत समिती कार्यालय मावळ याठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीनंतर आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 18, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Otherwise toll plaza at Somatane Phata Varsoli will be closed MLA Sunil Shelke warns

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातून जाणाऱ्या जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरील टोल प्लाझा असलेल्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि जागोजागी ब्लॅक स्पॉट ठिकाणी वारंवार होणारे अपघात, या प्रश्नांबद्दल आमदार सुनील शेळके यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, वारंवार पाठपुरावा करून देखील एमएसआरडीसी प्रशासन आणि आयआरबी प्रशासन यावर योग्य त्या उपाययोजना करीत नसल्याने येत्या दहा दिवसांत टोलप्लाझा ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत आणि ब्लॅकस्पॉट ठिकाणी अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना न केल्यास दहा दिवसांनंतर दोन्ही टोलनाके बंद पाडणार, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.

बुधवारी ( दि. १७ ) पंचायत समिती कार्यालय मावळ याठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीनंतर आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींनी जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर ठराविक ठिकाणी वारंवार होणारे अपघात आणि टोलनाका असलेल्या ठिकाणी होणारी वाहतुक कोंडी याबाबत प्रश्न उपस्थित केले.

त्यावर उत्तर देताना आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ब्लॅकस्पॉट ठिकाणी उपाययोजना करणे आणि टोलनाका असलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. परंतु वास्तवात अपेक्षित काम संबंधित यंत्रणेंकडून होताना दिसत नाही, त्यामुळे येत्या दहा दिवसांत याबद्दल ठोस असा निर्णय न घेतल्यास सोमाटणे फाटा आणि वरसोली हे दोन्ही टोलनाके बंद पाडणार.’ असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले


Previous Post

तळेगावचा येत्या रविवारचा आठवडे बाजार रद्द, सोमवारी भरणार आठवडे बाजार । Talegaon Dabhade

Next Post

मावळमधील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करून आर्थिक उन्नती साधावी – तालुका कृषी अधिकारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Farmers in Maval should start Prime Minister Micro Food Processing Industry

मावळमधील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करून आर्थिक उन्नती साधावी - तालुका कृषी अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.