Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या वीर जिजामाता शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका विजया दांगट यांनी विद्यार्थ्यांमध्ये वृत्तपत्र वाचन व पुस्तक वाचनाची संस्कृती रुजविण्यासोबतच त्यांच्या उपजत गुणांचा विकास विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून यशस्वीपणे घडवून आणला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पत्रकार दिनानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
शालेय जीवनापासूनच मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास भाषा ज्ञानातून व्हावा, या उद्देशाने दांगट या मराठी व इंग्रजी बोली भाषेच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देत आहेत. नगर परिषद व शिक्षण मंडळाने यंदापासून सुरू केलेला मराठी-इंग्रजी बोली भाषा अध्ययन उपक्रम, महान व्यक्तींचे विशेष दिन तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नगर परिषदेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
द रॉयल एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार तसेच यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रशिक्षण केंद्र (यशदा) चे मास्टर ट्रेनर व व्याख्याते विवेक गुरव यांनी मुख्याध्यापिका विजया दांगट आणि त्यांच्या सहशिक्षकांचे अभिनंदन केले. प्रेस फाउंडेशनतर्फे दांगट यांना शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे, प्रकल्प प्रमुख डॉ. संदीप गाडेकर, रेखा भेगडे, मयूर सातपुते, शिक्षक सागर सांगळे आणि ए.ए. खान उपस्थित होते. तसेच उपस्थित शिक्षकांमध्ये मनिषा लांजेकर, आशा गायकवाड, प्रज्ञा राठोड, धनश्री चौधरी, तनुजा मांढरे, सागर उकिरडे, सागर सांगळे, पल्लवी ठाकरे आणि वर्षा थोरात यांचा समावेश होता.
वृत्तपत्राच्या शालेय वाचन उपक्रमात नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळा अग्रेसर आहेत. साप्ताहिक वाचन व अवलोकन हे मुख्याध्यापिका विजया दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सुरू असते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृत्तपत्र वाचनाची सवय लागेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

