व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा

सध्याच्या प्रथम टप्प्यावर उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 8, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड मंगळवारी (दि. १३) होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. मंगळवारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन निर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची पहिली सभा होणार असून या सभेत नियमानुसार उपनगराध्यक्ष आणि तीन स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत एकूण २८ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ तर भाजपचे १० सदस्य आहेत. उर्वरित एक सदस्य अपक्ष आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांनी युती म्हणून निवडणूक लढवली होती.

महायुतीतील ठरलेल्या सामंजस्यानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाची संधी भाजपाचे संतोष दाभाडे यांना देण्यात आली असून उर्वरित अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश काकडे यांना नगराध्यक्षपद देण्यात येणार आहे. त्यानुसार सध्याच्या प्रथम टप्प्यावर उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

स्वीकृत सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, तर भाजपचा एक सदस्य निवडला जाणार आहे. दोन्ही पक्षांचे स्वतंत्र गट स्थापन झाले असून संख्याबळानुसार ही निवड होणार आहे. या निवडणुकीबरोबरच याच सभेत गटनेते तसेच विरोधी पक्षनेत्यांची निवडही करण्यात येणार आहे.

दरम्यान, उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून अनेक नगरसेवकांनी पहिली संधी मिळावी, यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पदांची मुदत प्रत्येकी सहा महिन्यांची असणार असल्याचे समजते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा
– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन ; भारतीय हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री, अशी होती कलमाडी यांची कारकीर्द
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहर भाजपाचे नेते दीपक भालेराव यांना मातृशोक ; शांताबाई भालेराव यांचे निधन । Vadgaon Maval

Next Post

Vijaya Dangat : विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणाऱ्या उपक्रमशील मुख्याध्यापिका विजया दांगट यांचा पत्रकार दिनी सन्मान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Enterprising principal Vijaya Dangat who instilled reading culture among students honored on Journalist Day

Vijaya Dangat : विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणाऱ्या उपक्रमशील मुख्याध्यापिका विजया दांगट यांचा पत्रकार दिनी सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.