व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा

वडगाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा मंगळवारी (दि. ६) पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 7, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sunil Dhore as Water Supply Committee Chairman of Vadgaon Nagar Panchayat MLA Sunil Shelke announcement

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा मंगळवारी (दि. ६) पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार सुनील शेळके, गणेश खांडगे, भास्करराव म्हाळसकर, गणेशआप्पा ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, बाळासाहेब ढोरे, पंढरीनाथ ढोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यादरम्यान आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मनोगतात वडगाव नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील गणेश ढोरे यांची वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापती पदी घोषणा केली.

आपल्या मनोगतात बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “सुनीलभाऊ मी जाहीरपणे सांगतो, तुम्ही सगळ्यांमध्ये सिनियर आहात. शहरात ४० – ४२ कोटीची पाणीयोजना सुरूये. अजुन पाच – दहा कोटी रुपये लागले, तर ते उभे करू. पण सभापती म्हणून तुम्हालाच जबाबदारी स्वीकारावी लागेल, या शहरातील सर्व पाण्याची व्यवस्था सर्वांना सोबत घेऊन तुम्हाला करावी लागेल. त्यातील तांत्रिक गोष्टी तुम्हाला समजतात. काही अडचणी आल्या तरीही त्या तुम्ही दूर करू शकता. तुम्ही व्यावसायिक देखील आहात, आणि त्यामुळे यातील त्रुटी तुम्हाला समजू शकतात. म्हणून ही महत्वाकांक्षी योजना कुणा नवख्याच्या ताब्यात न देता ती अनुभवी व्यक्तीच्या ताब्यात दिली पाहिजे.”

नगरपंचायत पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती ही नगरपालिकेतील एक महत्त्वाची उपसमिती आहे, जी शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, स्वच्छता राखणे आणि पाणी व स्वच्छता योजनांची अंमलबजावणी व देखभाल करणे यासाठी जबाबदार असते. यामध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या कामांचा समावेश असतो आणि यासाठी विशेष अभियंता व कर्मचारी नेमलेले असतात.

समितीची मुख्य कार्ये :
1. पाणीपुरवठा व्यवस्थापन : पिण्याच्या पाण्याची योजना आखणे, अंमलबजावणी करणे, वितरण करणे आणि देखरेख ठेवणे.
2. जलनिःसारण : सांडपाणी व्यवस्थापन (Sewerage System) आणि गटार व्यवस्थापनाची कामे करणे.
3. स्वच्छता : घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची देखभाल आणि स्वच्छतेची खात्री करणे.
4. योजनांची अंमलबजावणी : केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता योजना (उदा. जल जीवन मिशन) स्थानिक पातळीवर राबवणे.
5. ग्राहक सेवा : पाणीपट्टी आकारणे आणि पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या सेवांसाठी शुल्क निश्चित करणे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन ; भारतीय हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री, अशी होती कलमाडी यांची कारकीर्द
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी
– ‘एफडीए’ची मावळात आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई ! टाकवे बुद्रुक हद्दीतील कंपनीत टाकलेल्या छाप्यात साडेएकतीस कोटींचा मुद्देमाल जप्त


dainik maval jahirat

Previous Post

Darpan Balshastri Jambhekar । 6 जानेवारी, मराठी पत्रकार दिन । मराठी पत्रकारितेचे जनक : ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर

Next Post

महत्वाची बातमी ! इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी होणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

महत्वाची बातमी ! इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.