Dainik Maval News : लोणावळा शहरात उभारण्यात येत असलेल्या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर यांच्याकडून करण्यात आली आहे. याबाबत लोणावळा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात, सध्या लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लोणावळा नगर परिषदेमार्फत युद्ध पातळीवर चालू आहे. सदरचे काम अत्यंत सुबक व कलाकुसरी चे व लोणावळा शहराची शोभा वाढवणारे अशा पद्धतीने चालू आहे. परंतु हे काम चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची विचारात घेतली पाहिजे.
स्मारकाचे मेन गेट आणि महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उंची मध्ये फरक आढळतो आहे. त्यामुळे समोरून पाहता मेन गेट मुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा निदर्शनास येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हा चारही बाजूंनी निदर्शनास आला पाहिजे. त्यामुळे सदर अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढवावी. जेणेकरून चारही बाजूने महाराज हे शिवप्रेमींना दिसून येतील” असे निवेदन मनसे कडून देण्यात आले आहे.
पुढे, चौथऱ्याची उंची वाढविल्याशिवाय आपण स्मारकाच्या उद्घाटनाची घाई करू नये, अशी विनंती देखील कऱण्यात आली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
