Dainik Maval News : वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि.६) पहाटे पुन्हा एकदा अशीच घटना घडली असून वडगाव फाटा परिसरातून एक दुचाकी चोरीला गेली आहे.
दुचाकी चोरी करताना दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
वडगाव नगरपंचायत हद्दीतील वडगाव–तळेगाव फाटा परिसरात असलेल्या आदित्य वर्धन हाइट्स इमारतीसमोर बजाज पल्सर २२० (एमएच १४ डीवाय ११८०) ही दुचाकी पार्क केली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुचाकी चोरीला गेली.
सदर चोरीची घटना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

