Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नुकतेच निवडून आलेले संतोष दाभाडे पाटील यांनी शहरात प्रत्यक्ष कामास सुरूवात केली आहे. श्री. दाभाडे यांनी शुक्रवारी (दि.९) तळेगाव स्टेशन भागात भेट दिली.
तळेगाव स्टेशन परिसरात कित्येक वर्षांपासूनची समस्या म्हणजे विद्युत वाहिन्या उघड्यावर असणे, याबाबत नगरपरिषदेमार्फत सुरू असलेल्या कामाची नगराध्यक्ष दाभाडे यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी योग्य रितीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद देशक, प्रदीप टेकवडे, अनिल वेदपाठक, संतोष लोणकर, ऋषिकेश नागे आदी उपस्थित होते.
तळेगाव स्टेशन चौक येथील तळेगाव-चाकण रोडवरील होणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करून रस्ता रुंदीकरण्यासाठी ‘बंद गटाराचे’ आणि ‘लाईटच्या पोल’साठी लागणारे वायरिंगचा अडथळा होऊ नये म्हणून ‘अंडरग्राउंड वायरिंग’ ही दोन्ही कामे सुरू करण्यात आली आहे, असे श्री दाभाडे यांनी सांगितले.
तळेगांव स्टेशन येथील तळ्याची पाहणी
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच संतोष दाभाडे यांनी तळेगांव स्टेशन येथील तळ्याची पाहणी केली. या ठिकाणी तळेगावकर नागरिक मोठ्या प्रमाणात सकाळी व सायंकाळी चालण्यासाठी येत असतात. त्या ट्रॅक वरील खड्डे बुजवणे, तसेच इतर समस्या, कचरा ह्या बाबतीत त्यांनी पाहणी केली. तसेच CRPF येथून येणारे सांडपाण्याची पाहणी करून पुढील कामात चालना देण्यासाठी व लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

