Dainik Maval News : राज्यात रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज (दि. १३) अखेर घोषणा करण्यात आलेली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका आता होणार असून मंगळवारी (दि.१३) राज्य निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणुक होणार आहे.
राज्य निवडणुक आयोगाने मंगळवारी (दि.१३) दुपारी सव्वा चारच्या सुमारास पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, निवडणूक आयुक्त जगदीश मोरे यांसह सचिव काकाणे, श्री. पाटील हे याप्रसंगी उपस्थित होते. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर त्यानुसार आजपासून निवडणुका असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूका होणाऱ्या जिल्हा परिषद
कोकण – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
छ. संभाजीनगर – छ. संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर
संपूर्ण निवडणूक कार्यक्रमपत्रिका
जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक सूचनेची प्रसिद्धी – 16 जानेवारी
नामनिर्देशपत्र स्वीकारणे – दिनांक 16 ते 21 जानेवारी 2026
नामनिर्देशअर्जांची छाननी – 22 जानेवारी 2026
उमेदवारीअर्ज माघारीचा अंतिम दिनांक – 27 जानेवारी दु. 3 वाजेपर्यंत
अंति उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप – 27 जानेवारी दुपारी साडेतीन नंतर
प्रत्यक्ष मतदान दिनांक – 5 फेब्रुवारी 2026 स. 6.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत
मतमोजणी व निकाल जाहीर – 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजलेपासून
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक

