Dainik Maval News : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.१३) राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक देखील होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे एकूण १३ तालुक्यातून ७३ गट अर्थात ७३ जागा आहेत. पैकी मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ५ गट आहेत.
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट आणि त्यात समाविष्ट गण :
२९ टाकवे बुद्रुक जि.प. गट – ५७ टाकवे बुद्रुक पं.स. गण आणि ५८ नाणे पं.स. गण
३० इंदुरी जि.प. गट – ५९ वराळे पं.स. गण आणि ६० इंदुरी पं.स. गण
३१ खडकाळे जि.प. गट – ६१ खडकाळे पं.स. गण आणि ६२ कार्ला पं.स. गण
३२ कुसगांव बुद्रुक जि.प. गट – ६३ कुसगांव बुद्रुक पं.स. गण आणि ६४ काले पं.स. गण
३३ सोमाटणे जि.प. गट – ६५ सोमाटणे पं.स. गण आणि ६६ पं.स. गण
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण :
टाकवे बुद्रुक – अनुसूचित जमाती
इंदुरी – सर्वसाधारण महिला
खडकाळे – सर्वसाधारण महिला
कुसगांव बुद्रुक – सर्वसाधारण
सोमाटणे – सर्वसाधारण महिला
कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटावर असणार सर्वांचे लक्ष :
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे यंदा सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मावळ तालुक्यात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पाचही गटांपैकी केवळ कुसगांव बुद्रुक – काले हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या गटातील उमेदवार हा थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दावेदार असणार आहे. सोबत अध्यक्षपद सर्वसाधारण अर्थात खुल्या गटासाठी असल्याने महिला उमेदवार किंवा कोणत्याही गटातील उमेदवार देखील अध्यक्षपदी विराजमान होऊ शकते, ती शक्यता नाकारता येत नसल्याने उर्वरित गटांच्या उमेदवारांनाही अध्यक्षपदी बसता येऊ शकेल. परंतु संपूर्ण जिल्ह्यातील स्पर्धा लक्षात घेता, कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटावर सर्वांचेच लक्ष असेल.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
– नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव-कातवी मधील ठाकर समाजातील १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप
– भाजपाकडून ‘भयमुक्त मुंबई’चा नवा अध्याय : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आणि मुंबईकरांचा मोकळा श्वास
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण