Dainik Maval News : राज्यात मंगळवारी (दि.१३) राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा केली. निवडणूक घोषित झालेल्या पंचायत समित्यांमध्ये मावळ पंचायत समिती चा देखील समावेश आहे. २०२२ साली पंचायत समिती मावळची मुदत संपली होती. तेव्हापासून पंचायत समितीवर प्रशासक राज आहे. परंतु आता पंचायत समितीची निवडणूक होत असून मावळ पंचायत समितीच्या एकूण दहा गणांत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
मावळ पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. या दहाही गणांचे आरक्षण जाहीर झालेले आहे. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सोडतीसह मावळ पंचायत समितीच्या सभापती पदाचेही आरक्षण जाहीर झालेले आहे.
पंचायत समिती गणांचे आरक्षण खालीलप्रमाणे :
मावळ पंचायत समितीचे गण आणि आरक्षण
५७ – टाकवे बुद्रुक – सर्वसाधारण स्त्री
५८ – नाणे – अनुसूचित जमाती स्त्री
५९ – वराळे – सर्वसाधारण
६० – इंदुरी – सर्वसाधारण
६१ – खडकाळे – अनुसूचित जाती
६२ – कार्ला – सर्वसाधारण स्त्री
६३ – कुसगांव बुद्रुक – सर्वसाधारण
६४ – काले – सर्वसाधारण स्त्री
६५ – सोमाटणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग
६६ – चांदखेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
सभापती पदी असणार ओबीसी महिला
पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झालेले असून त्यानुसार मावळ पंचायत समिती चे सभापती पद हे नागरिकांचा मागासवर्ग महिला (ओबीसी) साठी राखीव आहे. मावळ तालुक्यात जे पंचायत समितीचे दहा गण आहे, त्यापैकी सोमाटणे गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि चांदखेड गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री करिता आरक्षित आहे. त्यामुळे या गणातून विजयी झालेल्या स्त्री उमेदवार ही थेट सभापती पदाची दावेदार असणार आहे.
दरम्यान, नाणे आणि खडकाळे हे दोन गण वगळल्यास उर्वरित सहा गणांमधूनही सर्वसाधारण जागेवरून एखादी ओबीसी महिला निवडून येऊ शकते. अशावेळी ती ओबीसी महिला उमेदवार देखील सभापती पदाची दावेदार असू शकते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
– नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव-कातवी मधील ठाकर समाजातील १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप
– भाजपाकडून ‘भयमुक्त मुंबई’चा नवा अध्याय : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आणि मुंबईकरांचा मोकळा श्वास
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण

