Dainik Maval News : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या बाबत मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समिती मावळच्या एकूण दहा जागा अर्थात दहा गण असून, भारतीय जनता पार्टी – शिवसेना – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांनी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे ठरविले असून त्याची चर्चा सुरू आहे, अशी माहिती भाजपा व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांनी दिली. दरम्यान आरपीआय कडून अद्याप याबाबत स्पष्टता आलेली नाही. परंतु भाजपा – शिवसेना यांच्या युतीचे चित्र जवळपास स्पष्ट आहे.
टाकवे बुद्रुक गटातील युतीचे चित्र स्पष्ट –
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मावळात होणाऱ्या भाजपा-शिवसेना युतीचे टाकवे बुद्रुक गटातील चित्र आता स्पष्ट झाले असून बुधवारी (दि.१४) झालेल्या बैठकीत टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद गटाची जागा भाजपाला, टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणाची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला आणि नाणे-वडेश्वर पंचायत समिती गणाची जागा भारतीय जनता पक्षाला देण्याचे ठरविल्याचे समजते.
त्याअनुषंगाने यापूर्वीच टाकवे बुद्रुक गणात शिवसेना पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या अश्विनी सोमनाथ कोंडे (असवले) यांना युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर पाठींबा दर्शविण्यात आला आहे. याबाबत शिवसेना आणि भाजपा पदाधिकारी यांनी दैनिक मावळसोबत बोलताना अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिली असून तालुक्यातील उर्वरित जागांवरील चित्र देखील लवकर स्पष्ट होईल, असे सांगितले. तसेच आरपीआयचे पदाधिकारी यांनी दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ आणि त्याची माहिती दिली जाईल, असे सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक