Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या होत असलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळ च्या निवडणुका महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकत्रितपणे लढविणार आहे. याबाबत काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांपक्षातील नेत्यांनी रविवारी (दि.१८) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
या पाचही पक्षांनी तालुक्यातील एकूण जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० अशी १५ जागांवर मविआ म्हणून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, शिवसेना (उबाठा) चे उमेश गावडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की, शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित राजकारण करीत लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. अलीकडे झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये तालुक्यात आघाडीने घेतलेल्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद पाहता, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय पक्का करण्यात आला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– भाजपाचा विजयी सूर मावळमध्ये चमत्कार घडविणार? मावळ भाजपाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नवसंजिवनीची अपेक्षा
– महत्वाची बातमी ! सायकल स्पर्धेकरिता मावळमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मावळचा लेक बनला मुंबईचा नगरसेवक ! मावळातील पारिठेवाडी येथील मंगेश पांगारे मुंबई मनपा निवडणुकीत नगरसेवकपदी विजयी
– वडगावची लढाई आणि ऐतिहासिक तह.. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान : पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला