व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी ! सायकल स्पर्धेकरिता मावळमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ सायकल स्पर्धा - टप्पा क्रमांक एक (मावळ-मुळशी) : पवन मावळातील प्रत्येक गावांतील नागरिकांसाठी महत्वाची बातमी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 17, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Important news District Collector orders changes to traffic on major roads in Maval for cycle competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने “पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ अंतर्गत २० जानेवारी २०२६ रोजी आयोजित टप्पा क्रमांक एकच्यावेळी सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यासोबत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहे.

या स्पर्धेचा टप्पा क्रमांक एक अंतर्गत पौड, लोणावळा ग्रामीण, कामशेत व वडगाव पोलीस स्टेशनहद्दीत एकूण ५३.८ कि.मी अंतर असून स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :
1. पौड पोलीस स्टेशन हद्दीत : पर्यायी रस्ता नसल्याने राज्य महामार्ग क्र. १३० वरील घोटावडे गाव बापुजीबुवा मंदिर ते अंबडवेट कमान, एम.डी.आर. प्रमुख जिल्हा रस्ता क्र. ११० वरील अंबडवेट कमान ते पौड करमोळी चौक तसेच एम.डी.आर प्रमुख जिल्हा रस्ता क्र. २६ वरील पौड करमोळी चौक ते काशिंग जवण चौक दरम्यान संपूर्ण वाहतूक बंद करण्यात येत आहे.

2. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत : मौजे चावसर, जवन क्र. २, ३ आदी गावाकडून येणारी वाहने मुंबई व पुणे बाजुकडे जाण्याकरिता जवन क्र. १ येथे न येता जवन क्र. २ व ३ चावसर आदी गावातील वाहने ही मौजे तुंगी फाटा मार्गे लोणावळा या पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे.
3. मौजे आवेगाव, शिंदगाव आदी गावाकडून येणारी वाहने ही कार्ला फाटा येथे येण्यास बंद करण्यात येणार असून आंबेगाव, शिंदगाव आदी गावातील वाहने ही दुधिवरे मार्गे औंढे – औंढोली पुढे लोणावळा या पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे.

4. कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत : कडधेगाव हे हिंजवडी, पवनानगर, पौडकडे जाणारे मुख्य जंक्शन असल्याने कामशेत ते पवनानगर पौड अशी जाणारी वाहतूक स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण बंद करण्यात येणार आहे.

5. कामशेत कि.मी. ४५/६०० ओव्हर ब्रीज पवना चौक कामशेत ते पवनानगर, पौड अशी पवनानगर मार्गाकडे जाणारी वाहतूक स्पर्धेच्या दिवशी जुने पुणे-मुंबई हायवे (एनएच ४८) कामशेत कि. मी ४५/६०० ओव्हर ब्रीज पवना चौक या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
6. पवनानगर, पौड, आर्डव, शिवणे, महागांव, शिरगांवकडे जाणारा कामशेतकडून एकचमार्ग असून पर्यायी मार्ग नसल्याने कामशेत ते पवनानगर, पौडकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे.

7. वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत : शिरगाव परंदवडीकडून येणारी वाहतूक बेबडओहोळ मार्गे शिवणे, शिवली बाजुकडे न पाठवता जुने मुंबई-पुणे हायवेने वळविण्यात येणार आहे. चांदखेडकडून डोणेकडे येणारी वाहतूक चांदखेड दरम्यान तसेच कामशेतमार्गे थुगांवकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने मौजे कामशेत येथे स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण बंद करण्यात येणार आहे.
8. मळवंडी ढोरे, येलघोल, शिवली गावाकडून आर्डव बाजुकडे येणारी वाहतूक भडवली गावाच्या अलीकडील चौकात येलघोल फाटा येथे सायकल स्पर्धा पूर्ण होईपर्यंत पुर्णपणे बंद करण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक


dainik maval jahirat

Previous Post

भाजपाचा विजयी सूर मावळमध्ये चमत्कार घडविणार? मावळ भाजपाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नवसंजिवनीची अपेक्षा

Next Post

महिलांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारचे ऐतिहासिक पाऊल ; देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ महाराष्ट्रात सुरू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Doctor examination clinic hospital checking

महिलांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारचे ऐतिहासिक पाऊल ; देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ महाराष्ट्रात सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.