Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मावळ च्या एकूण पंधरा जागांवरील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या युतीचे अधिकृत उमेदवार मंगळवारी (दि. २०) जाहीर करण्यात आले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक २०२६ मधील युतीच्या सर्व उमेदवारांनी तहसीलदार कार्यालय, वडगांव मावळ येथे आपले उमेदवारी अर्ज देखील दाखल केले.
तदनंतर, भारतीय जनता पार्टी – शिवसेना यांच्या युतीतील मावळ पंचायत समिती, जिल्हा परिषद परिषद गटांसाठी कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे आणि कोअर कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत एकूण १५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
जिल्हा परिषद गट निहाय युतीचे उमेदवार
टाकवे बु-नाणे गट – मधुकर लहू कोकाटे (भाजपा)
वराळे-इंदोरी गट – मेघा प्रशांत भागवत (भाजपा)
खडकाळा-कार्ला गट – आशा बाबुराव वायकर (भाजपा)
कुसगाव-काले गट – दतात्रय शंकर गुंड (भाजपा)
सोमाटणे-चांदखेड गट – शितल अविनाश गराडे (भाजपा)
पंचायत समिती गणनिहाय युतीचे उमेदवार
टाकवे बुद्रुक गण – अश्विनी सोमनाथ कोंडे (शिवसेना)
नाणे गण – संगीता ज्ञानेश्वर आढारी (भाजपा)
वराळे गण – रवींद्र निवृत्ती शेटे (भाजपा)
इंदोरी गण – श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे (भाजपा)
कार्ला गण – रंजना सुरेश गायकवाड (भाजपा)
खडकाळा गण – प्रकाश बाबुराव गायकवाड (भाजपा)
कुसगाव गण – नवनाथ पांडुरंग हारपूडे (भाजपा)
काले गण – सीमाताई मुकुंद ठाकर (भाजपा)
सोमाटणे गण – बाळासाहेब नथू पारखी (भाजपा)
चांदखेड गण – सुवर्णा बाळासाहेब घोटकुले (भाजपा)
या पत्रकार परिषदेला भाजपाचे निवडणूक प्रमुख बाळासाहेब नेवाळे, कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजू खांडभोर, भाजपाचे ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, शरद हलावळे, अभिमन्यू शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी
– राष्ट्रवादीकडे युतीसाठी कुठलाही प्रस्ताव नाही अन् मावळात राष्ट्रवादीसोबत युती नाही ! – बाळा भेगडे यांच्याकडून युतीला फुलस्टॉप
– इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम
