नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज, गुरुवार (22 डिसेंबर) चौथा दिवस होता. गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरले. मात्र, अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस चांगलाच वादळी झाला. ( Maharashtra Assembly Winter Session NCP State President Jayant Patil Controversial Statement Suspension Until End Of Session )
नेमकं सभागृहात काय घडलं?
दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आधी लोकसभा आणि त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला. राहुल शेवाळेंनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोन केल्याचा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने लोकसभेत केला. त्यानंतर आमदार नितेश राणेंनी नागपूर अधिवेशनात दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा काढून विधानसभेत एसआयटी चौकशीची मागणी केली. यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला.
विधानसभेमध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावे करण्यात आले होते. यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे 6 वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांकडून आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यावरून विरोधकांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली.
गेले काही दिवसांपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून होत आहे. #नागपूर_अधिवेशन #हिवाळीअधिवेशन #महाराष्ट्र pic.twitter.com/VKxGhtxjCf
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 22, 2022
दरम्यान, भास्कर जाधवांना बोलू देण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर जयंत पाटील यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. भास्कर जाधवांनीही तशी मागणी करायला सुरुवात केली. ‘आमची हरकत आहे. 14 सदस्य समोरून बोलले, 14 वेळा कामकाज तहकूब केले. आम्हाला एका सदस्याला बोलू देत नाही. तुम्ही सदस्यांचा जीव घेताल अध्यक्ष महोदय,’ असे भास्कर जाधव म्हणाले.
दरम्यान, याचवेळी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका,” असे म्हटले. त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. “जयंत पाटील यांना निलंबित करा,” अशी मागणी आमदारांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही “जयंत पाटील, हे आपल्याकडून अपेक्षित नाही,” असे म्हणत नाराजी व्यक्त केली आणि कामकाज तहकूब केले.
या निर्लज्ज 'सरकार' विरोधात लढत राहणार…
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय…!
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 22, 2022
…आधी बैठक नंतर निलंबन !
त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांविषयी असंवैधानिक शब्दप्रयोग केल्याचा आरोप जयंत पाटलांवर ठेवण्यात आला. यावर विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची कारवाई केली.
अधिक वाचा –
– ‘निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो’, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक – व्हिडिओ
– मोठी बातमी! भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
– मोठी बातमी! जैन समाजाच्या आक्रमक पवित्र्यापुढे सरकार झुकले, श्री सम्मेद शिखर स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा कायम