Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून पालकांनी अशा शाळांमध्ये मुलांचे प्रवेश करु नयेत, असा इशारा दिला आहे.
आगामी शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारची मान्यता नसतानाही शाळा सुरू ठेवण्यात येत असल्याचे प्रकार सुरू आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत अशा ४५ अनधिकृत शाळा आढळल्या असून, त्याची जिल्हा परिषदेने यादी जाहीर केली आहे. या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पुणे महापालिका कार्यक्षेत्रात १२ शाळा अनधिकृत असून, इरादा पत्र मिळालेल्या तीन शाळा आहेत. त्या शाळांना अंतिम मान्यता मिळाली नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ शाळा अनधिकृत आहेत. त्यापैकी एका शाळेला इरादा पत्र प्राप्त असून, त्यांनाही अंतिम मान्यता मिळाली नाही. सरकारच्या निर्णयानुसार, गुन्हा दाखल केलेला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २४ शाळा अनधिकृत असून, यापैकी १३ शाळांना सरकारची मान्यता नाही. त्यात ११ शाळांना मान्यता मिळालेली आहे, परंतु त्या शाळा मूळ जागेवर भरत नाहीत. अन्य ठिकाणी अनधिकृत स्थलांतरित करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
पुणे शहरातील अनधिकृत शाळा (PMC)
1. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी
2. महात्मा गांधी प्रशाला, संजय पार्क
3. आकांक्षा अकादमी/शाळा, लोहेगाव
4. TIMS तकवा इस्लामिक स्कूल आणि मकतब, कोंढवा
5 .सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रुक
6. इमॅन्युएल पब्लिक स्कूल, मोहम्मदवाडी रोड, हडपसर
7. आर्यन स्कूल, मानाजीनगर
8. लेगसी हायस्कूल, अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक
9. शिबिल नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल, अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक
10. ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेगाव बुद्रुक
11. आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री
12. एकारा इस्लामिक स्कूल, कौसरबाग, कोंढवा
पिंपरी चिंचवड शहर (PCMC)
1. ब्लूमिंग बड्स स्कूल, ताथवडे
2. लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर
3. माउंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी
4. डीएमके इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडीEducation
5. माने इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवाडी
6. नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी चऱ्होली
7. माइंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी चर्होई
8. हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड
9. कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली फाटा
पुणे ग्रामीण
1. सेंट झेवियर्स स्कूल, भोर
2. ओरिजिनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल, सोरतापवाडी, हवेली
3. न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल, सरडेवाडी, इंदापूर
4. इरा पब्लिक स्कूल, इंदापूर
5. अहिल्या इंग्लिश मीडियम स्कूल, कऱ्हाड, इंदापूर
6. जयश्री इंग्लिश मीडियम स्कूल, ठाकूरवस्ती (सोलू), खेड
7. ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल, मरकळ, खेड
8. ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूल, आळंदी, खेड
9. छत्रपती शिवाजी राजे विद्यालय, आळंदी, खेड
10. सरस्वती विद्यालय, आळंदी, खेड
11. हंपी डम्पी प्रीस्कूल, खेड
12. येशू ख्रिस्त इंग्लिश मीडियम स्कूल, कामशेत, मावळ
13. सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल, नवलाख उंबरे, मावळ
14. एंजेल हाई स्कूल, दत्तवाडी नेरे, मुळशी
15. क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल, जांबे, मुळशी
16. श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव, मुळशी
17. चाणक्य कनिष्ठ महाविद्यालय, पिरंगुट, मुळशी
18. सरस्वती क्लासेस, पिरंगुट, मुळशी
19. रोझलँड इंटरनॅशनल स्कूल, पिरंगुट, मुळशी
20. एलिट इंटरनॅशनल स्कूल, कासारंबोली, मुळशी
21. पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट, मुळशी
22. श्री विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट, मुळशी
23. श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल, वीर, पुरंदर
24. सेंट चवरा शाळा, सरदवाडी, शिरूर
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी ! तळेगाव नगरपरिषदेकडून कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा
– कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार
– पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा
– तळेगाव शहरातील कटारिया कुटुंबाचा समाजासमोर आदर्श ; तरुण मुलाच्या निधनानंतर अवयवदानातून ४ जणांना जीवनदान