देहू येथील इंद्रायणी नदी पात्रातून विनापरवाना वाळू उपसा केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुरज गोविंद काशीद (वय 22), प्रशांत रंगनाथ किरवे (वय 29) दोघेही राहणार इंदोरी(ता. मावळ, मूळ राहणार-नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ( Two Persons Arrested For Illegal Sand Mining Dehuroad Police Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यासह सोनू छोटेलाल शर्मा (वय 33), अमोल ऊर्फ अन्नप्पा हनमंतराया जमादार (वय 29), खाडे (सर्व रा. इंदोरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे आरोपी देहूतील इंद्रायणी नदी पात्रातील वसंत बंधाऱ्याजवळ विनापरवाना वाळू उपसा करत होते. याबाबत महसूल विभागाला माहिती मिळाली असता, पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार यांच्यासह त्यांच्या पथकाने तिथे कारवाई केली.
यामध्ये दोन पोकलेन आणि तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.
अधिक वाचा –
– रेल्वे विभागाची सुपरफास्ट कामगिरी, मळवली-कामशेत स्थानकांदरम्यान अवघ्या 5 तासात बांधला अंडरब्रीज
– ‘आधी पक्की घरे द्या, नंतरच राहत्या घरांना हात लावा, अन्यथा…’, किशोर आवारे यांचा प्रशासनाला इशारा