हॅण्ड इन हॅण्ड इंडिया, तळेगाव दाभाडे या सामाजिक संस्थेमार्फत ग्राम उत्थान कार्यक्रमांतर्गत शासकीय सामजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम मावळ तालुक्यामधील शिळींब गावामध्ये घेण्यात आले. ( Public Awareness Program About Government Schemes In Shilimb Village By Hand in Hand NGO Talegaon Dabhade )
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमाचा उद्देश हा ग्रामीण भागातील गरजू लोकांना केंद्र व राज्य शासनातर्फे राबिवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत जन जागृती करून लाभार्थ्यांच्या पर्यंत आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज करण्याचे सरकारी ठिकाण या गोष्टींची जाणीव व पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास सदर कार्यक्रमा मार्फत प्रयत्न करणे, हा आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम मावळ तालुक्यातील शिळींब गावातील लोकांना माहिती देण्यात आली. शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास परमेश्वर कांबळे व सतीश थारकुडे यांनी शासकिय योजनेबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाअंतर्गत लोकांना पॅन कार्ड, ई-श्रम कार्ड, आरोग्य कार्ड इत्यादी काढून देण्यात आले.
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून परमेश्वर कांबळे, सारिका शिंदे, सतीश थारकुडे, ऋतुजा शिंदे व पंढरीनाथ बालगुडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेकडून सारिका शिंदे यांनी शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास सहभागी ग्रामस्थांचे गावचे सरपंच, उपसरपंच यांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– अटलजींच्या जयंतीनिमित्त आदिवासी मुलांना कपडे आणि खाऊचे वाटप; प्रमोद शेलार यांच्या पुढाकारातून स्तुत्य उपक्रम
– वडगावात ‘मल्हार रेसिडेन्सी’मध्ये ख्रिसमस साजरा, बालगोपाळांनी पथनाट्यातून टोचले प्रौढांचे कान