व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावात ‘मल्हार रेसिडेन्सी’मध्ये ख्रिसमस साजरा, बालगोपाळांनी पथनाट्यातून टोचले प्रौढांचे कान

रविवारी (25 डिसेंबर) संपूर्ण जगभर भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन ख्रिसमस म्हणजे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 27, 2022
in लोकल, शहर
Christmas-Festival

Photo : Mahesh Dudhane


रविवारी (25 डिसेंबर) संपूर्ण जगभर भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन ख्रिसमस म्हणजे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रातही शहरी भागात नाताळ सण साजरा होताना दिसतो. खासकरुन ख्रिसमसच्या टोप्या घालून बाळगोपाळ या सणाचा आनंद घेताना दिसतात. नाताळ सणाचे औचित्य साधून वडगाव मावळ शहरातील मल्हार रेसिडेन्सी येथे सोमवारी (26 डिसेंबर) बालगोपाळांनी स्वपुढाकाराने विशेष नियोजन करुन छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पथनाट्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य, संगीत खुर्ची अशा कार्यक्रमांचे नियोजन करुन अखेरीस सर्व उपस्थितांना एक एक वृक्ष वाटप करुन लहानग्यांनी सर्वांचेच मन जिंकले. यात खासकरुन ‘मल्हार रेसिडेन्सी कुटुंबातील’ लहान मुलांनी सादर केलेल्या पथनाट्यातून सर्वांचेच प्रबोधन झाले आणि लहानग्यांनीच प्रौढांचे कान टोचल्याचे दिसून आले. पाणी बचावाचा संदेश देणारे हे पथनाट्य सर्वांना विचार करायला लावणारे होते. त्यानंतर काही लहान मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. तर अखेरीस सर्वांना पर्यावरणाचे महत्व पटावे, याकरिता एक एक झाड भेट म्हणून देण्यात आले.

लहान मुलांच्या या कल्पकतेचे आणि पुढाकाराचे मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर यांनी कौतूक केले. तसेच, वडगाव भाजपाचे उपाध्यक्ष दिपक भालेराव यांनीही बालगोपाळांच्या नेतृत्व गुणाचे कौतूक केले. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी महेश दुधाणे आणि टीमने लहान मुलांना चांगला पाठींबा दिला.

अधिक वाचा –

– शिवसेना नेते, आमदार उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेतील संपूर्ण भाषण, वाचा जसेच्या तसे
– तळेगाव दाभाडे । ‘विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देता यावे’, आश्रमशाळेतील अध्यापकांची प्रशिक्षण कार्यशाळा


dainik maval jahirat

Previous Post

शिवसेना नेते, आमदार उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेतील संपूर्ण भाषण, वाचा जसेच्या तसे

Next Post

अटलजींच्या जयंतीनिमित्त आदिवासी मुलांना कपडे आणि खाऊचे वाटप; प्रमोद शेलार यांच्या पुढाकारातून स्तुत्य उपक्रम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Distribution-Of-Clothes-And-Food-To-Tribal-Children

अटलजींच्या जयंतीनिमित्त आदिवासी मुलांना कपडे आणि खाऊचे वाटप; प्रमोद शेलार यांच्या पुढाकारातून स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.