हॅण्ड इन हॅण्ड इंडिया , तळेगाव दाभाडे आणि फिंचम इंडिया (CSR) यांच्यामार्फत उपजीविका व पर्यावरण संवर्धन केंद्रित हरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत शासकीय सामजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम मावळ तालुक्यामधील महागाव गावामधे घेण्यात आले. ( Government Social Security Scheme Awareness Program in Mahagaon through Hand in Hand NGO and Fincham India )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमाचा उद्देश हा ग्रामीण भागातील गरजू लोकांना केंद्र व राज्य शासनातर्फे राबिवल्या जाणाऱ्या विवीध योजनांबाबत जन जागृती करून लाभार्थ्यांच्या पर्यंत आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज करण्याचे सरकारी ठिकाण या गोष्टींची जाणीव व पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास सदर कार्यक्रमा मार्फत प्रयत्न करणे, हा आहे.
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास सारिका शिंदे आणि सतीश थारकुडे यांनी शासकीय योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी महागाव गावचे सरपंच सोपान सावंत, उपसरपंच पांडुरंग पडवळ, ग्रामसेवक एस. एल साळवे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाअंतर्गत लोकांना ई- श्रम कार्ड काडून देण्यात आले.
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून सारिका शिंदे, सतीश थारकुडे, अश्विनी खराडे, मलिका अन्सारी व पंढरीनाथ बालगुडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेकडून सारिका शिंदे यांनी शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास सहभागी ग्रामस्थांचे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– अटलजींच्या जयंतीनिमित्त आदिवासी मुलांना कपडे आणि खाऊचे वाटप; प्रमोद शेलार यांच्या पुढाकारातून स्तुत्य उपक्रम
– शिळींब गावात शासकीय योजनांबद्दल जनजागृती कार्यक्रम; अनेक नागरिकांना ई-श्रम, आरोग्य कार्ड आदी योजनांचा लाभ
– वडगावात ‘मल्हार रेसिडेन्सी’मध्ये ख्रिसमस साजरा, बालगोपाळांनी पथनाट्यातून टोचले प्रौढांचे कान