अमेरिकेत हिमवादळामुळे झालेले मृत्यू तांडव आणि नुकसानीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. त्यात आता भारतातील आसाम राज्यातही गारपिटीमुळे होत असलेली प्रचंड हानी सर्वांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
आसामच्या उत्तर भागातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून त्यामुळे चार जिल्ह्यांतील सुमारे 4,500 घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) अहवालानुसार, दिब्रुगढ, चरैदेव, शिवसागर आणि तिनसुकिया जिल्ह्यातील 132 गावांमध्ये एकूण 4,483 घरांचे नुकसान झाले आहे. ( Over 4,400 Houses Damaged As Hailstorm Lashes Parts Of Assam State CM Sarma Takes Stock )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जवळपास 18,000 लोक या संकटात बाधित झाले आहेत आणि गारपिटीचा फटका बसलेल्या कुटुंबांना तात्पुरता दिलासा प्रशासनाकडून दिला जात आहे. सोमवारी उशिरा आणि मंगळवारी पहाटे आसामच्या उत्तर भागात पुन्हा जोरदार गारपीट झाली.
Due to a severe hailstorm, several houses under Moran and Tingkhang revenue circles have been reportedly damaged.
Have instructed officials to make a detailed assessment of the damages caused. Government is extending all possible help to all those affected by it. pic.twitter.com/MgwklKBBAG
— Himanta Biswa Sarma (Modi Ka Parivar) (@himantabiswa) December 27, 2022
गारपिटीमुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक शाळांचेही नुकसान झाले आहे. राज्यात हिवाळ्याच्या काळात घडलेली ही एक दुर्मिळ घटना असल्याचे स्थानिक सांगत आहे. “झालेल्या नुकसानीचे तपशीलवार मूल्यांकन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे बाधित झालेल्या सर्वांना सरकार सर्वतोपरी मदत करेल,” असे ट्विट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– ‘बेळगाव, निपाणी, बिदरसह 865 गावे महाराष्ट्राचीच’, सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव महाराष्ट्राकडून एकमताने मंजूर!
– शिवसेना नेते, आमदार उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेतील संपूर्ण भाषण, वाचा जसेच्या तसे