व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी परभणीतून आरोपीला पकडले

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 13, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : घरगुती वादातून आणि दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन तिचा खून करणाऱ्या आणि तब्बल १८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने परभणी येथून अटक केली.

लिंबाजी नामदेव सोगेवाड (वय ५८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १ मार्च २००८ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कुसगाववाडी (ता. मावळ, जि. पुणे) येथे ही दुर्दैवी घटना घडली होती. आरोपी लिंबाजी सोगेवाड हा दारू पिऊन घरी आला होता. त्याने आपली पत्नी व फिर्यादी लता लिंबाजी सोगेवाड (वय २५) यांच्याकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने स्वयंपाकघरातील रॉकेलचे कॅन आणून तिच्या अंगावर ओतले आणि काडेपेटीने पेटवून देऊन तिचा निर्घृण खून केला होता. या घटनेनंतर आरोपी गेल्या १८ वर्षांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार होता.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, प्रभारी अधिकारी भूषण माने आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण, जय पवार, ईश्वर काळे, केतन तळपे, गोकूळ खेडकर, अमोल गवारी आणि महातपूरचे पोलिस पाटील विजय चाफळे यांनी पार पाडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण करीत आहेत.

तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, गुन्ह्यातील फरारी आरोपी हा परभणी जिल्ह्यात राहत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण, पोलिस हवालदार केतन तळपे आणि पोलिस शिपाई गोकूळ खेडकर यांचे पथक तातडीने परभणीकडे रवाना करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास केला असता, आरोपी लिंबाजी सोगेवाड हा स्वतःचे नाव, पत्ता आणि अस्तित्व बदलून गंगाखेड तालुक्यातील महातपूर गावात राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिस प्रशासनाकडून ‘फरारी व पाहिजे आरोपी शोध विशेष मोहिमे’अंतर्गत फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक भूषण माने आणि महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले
– “स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम
– मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

Next Post

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.