मावळ तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मावळ तालुक्यातील नायगाव येथे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात दगड, लाठी-काठी यासह धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर येत असून या प्रकरणी कामशेत पोलिसांत दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ( Fights Between Two Groups Naigaon Maval Taluka Complaint Lodged In Kamshet Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कामशेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव येथे नवनाथ नथू चोपडे यांच्या घरासमोर किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यात कोयते, दगड, पिस्तूल यांचा वापर करण्यात आला. दोन्ही गटांनी परस्पराविरोधात तक्रारी दिल्या आहेत. आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून फरार झालेल्यांचा शोध पथकाद्वारे पोलीस शोध घेत आहेत. मंगळवारी सकाळी सोमनाथ उर्फ स्वामी गायकवाड आणि आकाश शंकर लालगुडे यांनी परस्परविरोधात तक्रारी दिल्या आहेत. या घटनेत योगेश अनंता गायकवाड, प्रमोद सोपान सांडभोर, मंगेश भीमराव मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप करत आहेत.
अधिक वाचा –
– मावळमधील दुर्गम भागातील मोरवे शाळेला शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर कुलकर्णी यांची भेट
– ‘हॅण्ड इन हॅण्ड’ आणि ‘फिंचम इंडिया’ मार्फत महागावमध्ये शासकीय सामजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम
– अटलजींच्या जयंतीनिमित्त आदिवासी मुलांना कपडे आणि खाऊचे वाटप; प्रमोद शेलार यांच्या पुढाकारातून स्तुत्य उपक्रम