Dainik Maval News : वाकसई विकास सोसायटीच्या चेअरमनपदी हभप काशिनाथ धोंडु शेलार, तर व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल पांडुरंग केदारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोसायटी सदस्यांमध्ये ठरल्याप्रमाणे मावळते चेअरमन खंडू येवले, आणि व्हाईस चेअरमन धोंडीबा केदारी यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त पदांसाठी हि निवडणूक घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी ह.भ.प. काशिनाथ धोंडु शेलार, तर व्हाईस चेअरमन पदासाठी विठ्ठल पांडुरंग केदारी यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन एम. एम. नरोटे, सचिव म्हणुन सचिन भानुसघरे यांनी काम पाहिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमोल केदारी, मावळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या उपसभापती सुनिता केदारी, जेष्ठ संचालक भरत येवले, सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे, वाकसईचे उपसरपंच सुरेश केदारी, सदस्य सुर्यकांत शेलार यांच्यासह संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
