मावळ तालुक्यातील चिखलसे, अहिरवडे, कुसगाव खुर्द येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी (27 डिसेंबर) संपन्न झाला. ‘ जल जीवन मिशन ‘ ( Jal Jeevan Mission ) अंतर्गत या पाणी पुरवठा योजनांसाठी एकुण 2 कोटी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
या निधीतून अहिरवडे व कुसगाव येथे पाण्याची टाकी होणार होणार असून पाणी वितरणासाठी सुमारे 15 किलोमीटर लांबीची पाईपलाईन करण्यात येणार आहे.पुढील पाच महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. ( Tap Water Supply Scheme Under Jal Jeevan Mission in Chikhalse Ahirwade Kusgaon Khurd Villages Of Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भुमिपूजन समारंभास माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्ष सारिका शेळके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष पुष्पा घोजगे, ओबीसी सेल अध्यक्ष संध्या थोरात, सरपंच सुलभा भोते, सविता बधाले, सुनीता सुतार, कुसगाव उपसरपंच दिपाली लालगुडे, सदस्य कल्याणी काजळे, सविता सांगळे, मनिषा लालगुडे, पूनम आल्हाट, श्रुती मोहिते, वर्षा नवघणे, मनीषा लालगुडे, शशिकला सातकर, मनीषा भसे, सुवर्णा घोलप, अनिता मोहोळ, मीनाक्षी वाळुंज, शिल्पा चौधरी, अर्चना काजळे, सरपंच पप्पु येवले, माजी सरपंच, वि. सदस्य सुनिल काजळे, बाळासाहेब काजळे, बळवंत काजळे, संदीप काजळे, विजय काजळे, बंटी लालगुडे, तानाजी दाभाडे, गजानन शिंदे, निलेश दाभाडे, मंगेश राणे आदी मान्यवर, आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गावातील नागरिकांनी रस्त्यांवर रांगोळ्या काढून तसेच ढोल लेझीमच्या गजरात मिरवणूक काढून मान्यवरांचे भव्य स्वागत केले. नव्याने होणार असलेल्या या नळ पाणी पुरवठा योजनेमुळे चिखलसे, अहिरवडे व कुसगाव खुर्द या तिन्ही गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने येथील नागरिकांनी भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार सुनिल शेळके यांचे विशेष आभार मानले.
अधिक वाचा –
– गायरान जमिनीच्या विषयावर लवकर भुमिका स्पष्ट करावी… अन्यथा मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू – प्रकाश आंबेडकर
– खळबळजनक! मावळमधील ‘या’ गावात दोन गटांत तुफान हाणामारी; अनेकजण जखमी, 8 जणांना अटक