मावळ ( Maval ) तालुक्यातील तळेगाव ( Talegaon ) येथे वेदांता ग्रुप आणि फोक्सकॉन ( Vedanta And Foxconn ) कंपनीच्या संयुक्त भागीदारीतून निर्मित होणारा प्रकल्प आता गुजरात ( Gujarat ) राज्यात हलवण्यात आला आहे. सुमारे 1 लाख 58 हजार कोटी इतक्या भांडवली गुंतवणूकीचा हा दांडगा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरात राज्यात गेला आहे.
हेही वाचा – Vedanta Foxconn Project : ‘मावळची सुज्ञ जनता हे कधीही विसरणार नाही’ : आमदार शेळके
महत्वाचे म्हणजे हा प्रकल्प मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) तळेगाव जवळ होणार होता. त्यामुळे या प्रकल्पाच्या जाण्याने मावळ तालुक्यातील भुमिपुत्रांचा रोजगारही हिरावला गेला आहे. याच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( NCP ) वतीने गुरुवारी ( 15 सप्टेंबर ) रोजी दुपारी 1 वाजता तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. ( Vedanta Foxconn project To Gujarat Nationalist Congress Party March Maval Tehsil Office )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मोर्चाबद्दल अधिक माहिती;
वेळ : गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता.
स्थळ : ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण, वडगाव मावळ
आयोजक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मावळ
( Nationalist Congress Party March On Maval Tehsil Office )
अधिक वाचा –
भाजपकडून ‘टाळाठोक’ आंदोलनाची हाक, वडगाव शहरात होणार आंदोलन
बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी! थेट गुजरात राज्यात करतायेत ‘हे’ खास काम