पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती झाली आहे. एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत आम्ही आज युती करत आहोत. त्याची घोषणा करत आहोत, असे पत्रकार परिषदेत सांगितले. ( Eknath Shinde And Jogendra Kawade Press Conference Peoples Republican Party And Balasahebanchi Shiv Sena Party Alliance )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नरिमन पॉईंट, मुंबई येथील 'बाळासाहेब भवन' येथे प्रसारमाध्यमांशी संवाद https://t.co/7MUm9tXWOo
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टी’चे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या युतीची घोषणा केली. कवाडे हे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! संप काळातही वीजपुरवठा सुरळीत राहणार, पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे 24 तास सेवा, जाणून घ्या
– कर्तृत्ववान नेता काळाच्या पडद्याआड गेला; आमदार लक्ष्मण जगताप यांना खासदार श्रीरंग बारणेंकडून श्रद्धांजली अर्पण