व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने 7 मे 2023 रोजी सामुदायिक विवाह सोहळा निश्चित करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 5, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Wedding

File Image


रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने 7 मे 2023 रोजी सामुदायिक विवाह सोहळा निश्चित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात डिस्ट्रिक्ट फौंडेशन डायरेक्टर रोटरी क्लब नितीन ढमाले, रोटरी सिटीचे अध्यक्ष दिपक फल्ले, प्रकल्प प्रमुख विलास काळोखे, क्लब ट्रेनर दिलीप पारेख, सेक्रेटरी सुरेश शेंडे, संतोष शेळके, किरण ओसवाल यांचे हस्ते नारळ वाढवून नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास मिलिंद निकम, विनोद राठोड, राकेश ओसवाल, प्रशांत ताय, संजय वाघमारे, आनंद पूर्णपात्रे हे उपस्थित होते. ( Community marriage ceremony organized by Rotary Club of Talegaon Dabhade City )

रोटरी क्लब ऑफ तळेगांव सिटी घेत असलेला उपक्रम गोरगरीब जनतेसाठी फार उपयुक्त आहे. पुणे शहरातील क्लबची मदत घेऊन 100 लग्न सोहळ्यात लावण्याचा मनोदय नितीन ढमाले यांनी व्यक्त केला. समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला सर्वोतोपरी मदत करावी असे प्रतिपादन नितीन ढमाले यांनी केले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

क्लबच्या सामुदायिक विवाह सोहळा उपक्रमाची माहिती अध्यक्ष दिपक फल्ले यांनी प्रास्ताविकातून विशद केली. यामध्ये सहभागी होणाऱ्या वधूवरांसाठी मोफत गॅस शेगडी, गॅस सिलेंडर, संसार उपयोगी भांड्यांचा संच, वधू वरांचा संपूर्ण पोशाख, भाग्यवान वधू व वर यांना तीन मोबाईल लकी ड्रॉ द्वारे काढण्यात येणार आहे, भाग्यवान वधू-वरांस लकी ड्रॉ द्वारे गोदान करण्यात येणार आहे. सर्व वधू-वरांना सोन्याची नथ भेट देण्यात येणार आहे. सर्व वधू-वरांना साखरपुडा व लग्नाचा पूर्ण पोशाख मोफत देण्यात येणार आहे. वधू-वरांची भव्य शोभायात्रा, वधूवरांना विवाह प्रमाणपत्र ,वऱ्हाडी लोकांसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था हळदी,साखरपुडा व लग्नासाठी भव्य प्रशस्त मंडप अशा सर्व सुविधा रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने देण्यात येणार आहे.

मावळ पंचक्रोशीतील गोरगरीब, दिन दुबळ्या, आदिवासी भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवावी व लवकरात लवकर विवाह नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष दीपक फल्ले यांनी केले. सूत्रसंचालन भगवान शिंदे यांनी केले ‌तर आभार शाहीन शेख यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी रेशमा फडतरे, शरयु देवळे, सुनंदा वाघमारे, प्रसाद पादिर, सुरेश दाभाडे, प्रदीप टेकवडे, प्रसाद बानगुडे, तानाजी मराठे, विजय सातकर, सौरभ मेहता यांनी विशेष परिश्रम घेतले.

अधिक वाचा –

– धक्कादायक! वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून चिंचवडमधील युवकाचा मृत्यू
– पवन मावळ । मोरवे शाळेत सावित्रीच्या लेकींनी साजरी केली सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती


dainik maval jahirat

Previous Post

धक्कादायक! वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून चिंचवडमधील युवकाचा मृत्यू

Next Post

दिनांक 5 ते 8 जानेवारीपर्यंत लोहगड, घेरेवाडी परिसरात कलम 144 लागू; संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाचे कडक पाऊल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Section 144

दिनांक 5 ते 8 जानेवारीपर्यंत लोहगड, घेरेवाडी परिसरात कलम 144 लागू; संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाचे कडक पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.