देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ एक अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवार (दिनांक 6 जानेवारी) रोजी सकाळी 8 वाजण्यापूर्वी एका महिलेचा रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ( An Unidentified Woman Died Due To Hit By Train Near Dehu Road Railway Station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजण्यापूर्वी देहूरोड रेल्वे स्टेशन रे.कि.मी.नं. 165/35 जवळ एक अनोळखी महिला (वय अंदाजे 70 वर्षे) हिचा धावत्या रेल्वेची धडक बसल्याने मृत्यू झाला आहे. सदर महिलेचे वर्णन अंगाने सडपातळ, रंगाने गोरी, तांबडी लांब केस असे असून तिच्या अंगामध्ये राखाडी रंगाचा गाऊन आणि गुलाबी रंगाचे स्वेटर परिधान केलेले आहे. एखाद्या धावत्या रेल्वे गाडीची ठोकर लागून हातापायाला जबर मार लागून ती मृत पावली आहे. तिच्या वारसा बाबत काही माहिती मिळाल्यास पोलिस हवालदार वसंत कुटे ( मो. नं. 9923385898 ) यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक वाचा –
– बिबट्या आला रे.! मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर – पाहा व्हिडिओ
– व्हिडिओ – शिंग्रोबाचीच कृपा, बोरघाटात ब्रेक फेल झालेली बस झाडाला अडकली, 64 विद्यार्थी बचावले