व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अतिक्रमणविरोधी कारवाईत झालेल्या वादामुळे व्यापाऱ्यांचा बंद, शगुन चौकात ठिय्या आंदोलन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पिंपरी कॅम्प मध्ये कारवाई करीत असताना व्यापाऱ्यांशी वाद झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 12, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Traders-Closed-And-Proteste-Pimpri-Chinchwad

Photo : Swapnil Hajare


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पिंपरी कॅम्प मध्ये कारवाई करीत असताना व्यापाऱ्यांशी वाद झाला. यानंतर व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांचा निषेध करीत दुकाने बंद करून शगुन चौकात ठिय्या आंदोलन केले. गुरुवारी सकाळी अतिक्रमन विरोधी पथकाने पिंपरी कॅम्प परिसरात अतिक्रमण कारवाई सुरू केली. यावेळी पथकातील सुरक्षा रक्षकांनी व्यापाऱ्यांवर लाठीचार्ज केला आणि दुकानात घुसून कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की करीत त्रास दिला असा आरोप पिंपरी चिंचवड मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी केला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मनपा अधिकाऱ्यांचा निषेध करीत दुपारी बारानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून शगुन चौकात ठिय्या आंदोलन केले. यावेळी ‘अ’ प्रभाग क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे यांनी श्रीचंद आसवानी, माजी उपमहापौर हीरानंद उर्फ डब्बू आसवानी, माजी नगरसेविका सीमाताई सावळे, आशा शेंडगे आणि व्यापारी प्रतिनिधींशी आंदोलन मागे घेणे विषयी संवाद साधला. यानंतर व्यापारी शगुन चौकातून मोर्चा काढून मनपा भवना समोर आले. नंतर श्रीचंद आसवानी, डब्बु आसवानी, सीमाताई सावळे, आशा शेंडगे, रोमी संधू, निरज चावला, नारायण पोपताणी, शाम मेघराजानी यांच्या शिष्ट मंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना भेटून निवेदन दिले. ( Controversy in anti Encroachment Action In Pimpri Chinchwad Due To Dispute Traders Closed And Protested )

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पिंपरी चिंचवड मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी सांगितले की, महानगरपालिकेने कारवाई करण्यास आमचा विरोध नाही. परंतु व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणारे व व्यापाऱ्यांवर लाठीचार्ज करणारे कृत्य अधिकाऱ्यांनी व कर्मचारी करू नये. आज झालेल्या कारवाई वेळी सुरक्षारक्षकांनी व्यापाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दुकानात घुसून मारले आहे. याबाबतचे व्हिडिओ शूटिंग अधिकाऱ्यांना आम्ही दिले आहे. महानगरपालिकेने पिंपरी कॅम्प व परिसरातील पदपथांवर असलेले अतिक्रमण काढावे अशी आम्ही वेळोवेळी मागणी केली आहे. याकडे दुर्लक्ष करीत अधिकारी बेकायदेशीर असणाऱ्या पथारी वर कारवाई करण्याऐवजी अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास देऊन त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी जर पदपथावर अतिक्रमण केले असेल तर त्या व्यापाऱ्यांना पाच, दहा हजार रुपये दंड करावा. असे केल्यास ते व्यापारी पुन्हा अतिक्रमण करणार नाही. तसेच बेकायदेशीरपणे रस्त्यावर बसून दुकानदारांना त्रास होईल अशा पद्धतीने व्यवसाय करणारे पथारी व्यवसायिकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने केली आहे.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, अचानक हार घेऊन पुढे आला व्यक्ती आणि… पाहा व्हिडिओ
– आधी दुचाकीला धडक, नंतर दुचाकीस्वार महिलेसोबत गैरवर्तन; मुजोर रिक्षाचालकाला तळेगाव पोलिसांकडून अटक


dainik maval jahirat

Previous Post

श्रीक्षेत्र देहूत गाथा चिंतनाचे पहिले सत्र अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न

Next Post

400 ग्रॅम वजनाचे बाळ पुण्यात जगले आणि वाढले; 94 दिवसांच्या मुक्कामानंतर 2130 ग्रॅम वजनासह निरोगी बाळ घरी गेले

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
400-gram-baby-lived-and-grew-up-in-Pune

400 ग्रॅम वजनाचे बाळ पुण्यात जगले आणि वाढले; 94 दिवसांच्या मुक्कामानंतर 2130 ग्रॅम वजनासह निरोगी बाळ घरी गेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.